Authored by उमेश पांढरकर | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 19, 2022, 6:57 PM
Nandurbar Crime News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरानजीक असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना हाय प्रोफाईल पुरुष व महिलांचा समावेश ६३ जणांना अटक तर पोलिसांनी ३५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

हायलाइट्स:
- अवैध झन्ना मन्ना जुगार अड्ड्यावर धाड
- हाय प्रोफाईल पुरुष व महिलांचा समावेश
- ६४ जणांना अटक करत ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्यातील बेडकी पाडा गावातील एका शेड मध्ये चालणाऱ्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. जुगार खेळतांना हाय प्रोफाईल पुरुष व महिलांचा समावेश ६३ जणांना अटक तर पोलिसांनी ३५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. या छाप्यात ७ लाख २३ हजारांची रोकड आणि चार महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी.जी शेखर पाटील यांचे पथक आणि नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.
यामध्ये जुगार खेळणाऱ्या जवळपास ५० पुरुष आणि चार महिलांसह सर्व्हीस देणाऱ्या १० जणांना देखील अटक करण्यात आली आहे. आज भल्या पहाटे गोपनीय पद्धतीने पोलिसांनी हे छापा सत्र राबविले आहे. या छाप्यानंतर सीमावर्ती भागातील अवैध धंदे पुन्हा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे छाप्यात गुजरात राज्यातील अनेक जुगारी अडकले आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network