खून झालेल्या शशिकांत यांच्या मुलाचे यापूर्वी तिघांपैकी एका आरोपीशी भांडण झाले होते. त्यात कारंडे यांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी त्यावेळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. मुलीशी बोलणे व चॅटिंग करण्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. प्रेमामध्ये तो अडथळा आणतो, असा समज आरोपींचा झाला होता. त्यातून त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला होता. या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. परंतु ते अल्पवयीन असल्याने जामिनावर सुटले. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी खून प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीने कारंडे यांच्या मुलाला उद्देशून, ‘आबाद रहे ना रहे, लेकीन कब्रस्थान उनको जरूर बनाएंगे, फिक्स बिग शॉट’, असे स्टेटसही ठेवले होते.
काल खून झालेल्या शशिकांत यांनी ७ ऑगस्टला आरोपीने ठेवलेले स्टेटस पाहिले. त्यांनी आपल्या मुलाला सावध केले होते. तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतो. मागील प्रकरणानंतर त्याने या अल्पवयीन आरोपींशी संबंध ठेवणे बंद केले होते. शशिकांत यांनी जुने घर बदलत नवीन ठिकाणी राहायला जाणे पसंत केले होते. शिवाय भांडणे करू नका, असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी दिला होता.
मुलगा हाती येत नसल्याने त्याच्या ऐवजी त्याच्या वडिलांचा काटा काढायचा, असे अल्पवयीनांनी ठरवले. काल म्हणजेच १८ ऑगस्टला रोजी मुलीला आणण्यासाठी शशिकांत कारंडे हे कवी मोरोपंत शाळेत गेले होते. यावेळी त्या परिसरात दबा धरून बसलेल्या तिघांनी कुऱ्हाड आणि सत्तुराने त्यांच्यावर वार केले. त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा शशिकांत यांनी प्रयत्न केला. परंतु आरोपींनी त्यांचा पाठलाग करत त्यांना मारले.
cialis super active real online store – https://cialiswithoutprescription.pro/#
india pharmacy – https://pharmacyindia.pro/#