अक्कलकोट येथे असलेल्या कर्नाटक सीमेवरील हिरोळी गावात मोठा अनर्थ टळला आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या दोन अल्पवयीन लेकरांना विहिरीत टाकलं आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

गावातील इतर रहिवाशांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत दोन्ही लेकरांना बाजूला केले. कन्नड भाषेत महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हिरोळी गाव अक्कलकोट(महाराष्ट्र) आणि गुलबर्गा(कर्नाटक) सीमेवर आहे. याबाबत अक्कलकोट दक्षिण सोलापूर पोलीस ठाणे येथे नोंद नसल्याची माहिती मिळाली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.