डोलोची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्सनं डॉक्टरांना गिफ्ट्स दिली असल्याची माहिती आयकर खात्यानं टाकलेल्या छाप्यांमधून समोर आली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. आता या प्रकरणावर मायक्रो लॅब्सनं स्पष्टीकरण दिलं आहे.

डोलोची किंमत कशी ठरवली जाते याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कंपनी दर निश्चितीबद्दलचे सर्व नियम पाळते, अशी माहिती गोविंदराजू यांनी दिली. करोना महामारीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील बऱ्याचशा ब्रँड्सला मागणी होती. त्या कालावधीत डोलो ६५० अनेक डॉक्टरांनी प्रीस्क्राईब केली होती. डोलोला असलेली मागणी लक्षात घेता आमच्या अनेक कारखान्यांनी इतर औषधांचं उत्पादन थांबवून डोलोच्या निर्मितीला प्राधान्य दिलं. देशाला गरज असताना कंपनीनं औषधाचं उत्पादन केलं, असं गोविंदराजू यांनी म्हटलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.