दापोली : कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यात पाजपंढरी येथे गोविंदा नाचताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने ५२ वर्षीय वसंत लाया चौगले या मच्छीमार व्यक्तीचे निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते गोविंदा खेळण्याचा आनंद घेत होते. त्यांनी दहीहंडी उत्सवात फेर धरून आनंदोस्तवही साजरा केला. पण याचवेळी त्यांना नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली. वसंत लाया चौगले असे मृत गोविंदांचे नाव आहे. ते पाजपांढरी गावचे रहिवासी होते. सध्या त्यांचे वास्तव्य हर्णै येथे होते. (govinda died of a heart attack while dancing in dahihandi in dapoli)

हर्णै पाजपंढरी गावात कोळी समाज बांधवांतर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण या दुःखद घटनेमुळे गावातील गोविंदा सण कार्यक्रम रद्द करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- दोघे बाइकवरून जात होते, अचानक बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली, पुढे घडले ते…

गावात सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यामध्ये वसंत चौगुले सहभागी झाले होते. पण नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याआधीच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

govinda died of a heart attack while dancing in dahihandi in dapoli

उत्साहात नाचतानाच हृदयविकाराच्या झटक्याने गोविदाचा मृत्यू

क्लिक करा आणि वाचा- एसटीची रिक्षाला धडक, चालकाचा ताबा सुटला; बस धरणाच्या पाण्यात जाणार तितक्यात…

चौगले यांचा मासेमारी हा व्यवसाय होता. दोन बोटींचे ते मालक होते. पण सध्या त्या नादुरुस्त आहेत. पाजपंढरी गावातील होमावळे मंडळीतले वसंत लाया चोगले हे सक्रिय कार्यकर्ते होते. होमावळे मंडळी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्यावर उदया शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास अंत्यविधी होणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी,मुले असा मोठा परिवार आहे.

क्लिक करा आणि वाचा- अनिल परबांनी केलेल्या ‘त्या’ अन्यायाची व्याजासकट परतफेड करू; कदमांचा सज्जड इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here