मुंबई : करोनाच्या संकटकाळानंतर बेरोजगारीचा (Unemployment) मुद्दा कळीचा बनलेला असताना आता कर्मचारी कपातीची चिंता वाढवणारी बातमी येऊन थडकली आहे. जगभरातील तब्बल ५० टक्के कंपन्या आर्थिक मंदीच्या काळात कर्मचारी कपातीची योजना आखत असल्याची माहिती अमेरिकेतील ‘पीडब्ल्यूसी पल्स- मॅनेजिंग बिझनेस रिस्क्स २०२२’ द्वारे (PWC) करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. जगभरातील बहुतेक कंपन्या या बोनसची रक्कमही कमी करण्याचा निर्णय घेणा असून काही कंपन्या नोकऱ्यांची ऑफरही रद्द करत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. (50 percent of the companies in the world decided to reduce the workforce)

आर्थिक मंदीचा फटका जगभरातील बहुतेक कंपन्यांना बसला असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कंपन्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात कर्मचारी कपात हा एक प्रभावी उपाय असल्याचे कंपन्यांचे मत बनल्याचे स्पष्ट होत आहे. जुलै महिन्यापर्यंत मायक्रोसॉफ्ट आणि मेटासारक्या मोठा आयटी कंपन्यांनी अमेरिकेत ३२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे या आयटी कंपन्यांच्या शेअर्सची विक्री मोठ्या प्रमाणात झालेली असली तरी दुसरीकडे मात्र आयटी सेक्टरवर आलेले मंदीचे संकट अजूनही घोंघावत असल्याचेच दिसत आहे.

आनंदाची बातमी! CNG-PNG दरांबाबत अदानींचा मोठा निर्णय, जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा
अशी आहे भारतातील स्थिती

भारतात करोनाचे संकट आल्यापासून आतापर्यंत २५ हजारांहून अधिक स्टार्टअप कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. या बरोबर या वर्षभरात १२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. आजही कंपन्या टिकवण्यासाठी हे सावधगिरीचे उपाय म्हणून कंपन्या अवलंबताना दिसत आहेत. दरम्यान ग्राहक, बाजार, तंत्रज्ञान, मीडिया आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या या समस्येवर मार्ग काढण्यासाठी ऑटोमेशनमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

नोकरदारांसाठी खुशखबर! आता १ वर्षाच्या नोकरीवरही मिळणार ग्रॅच्युइटी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
तर दुसरीकडे आरोग्य सेवा क्षेत्राला मात्र अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या क्षेत्रात अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत असून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त करण्यावर हे क्षेत्र लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसत आहे.

जीवन विमाचे विविध प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? आधी जाणून घ्या आणि मगच निर्णय घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here