Mumbai Breaking News : मुंबईकरांसाठी ही बातमी अतिशम महत्त्वाची असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण, रायगडनंतर आता मुंबईत धोका वाढत आहे. मुंबई पोलिसांना आलेल्या एका मेसेजमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

 

Mumbai Police news
मुंबई : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथं दोन संशयास्पद बोट आढळून आल्यानंतर आता राज्यासाठी आणखी एक धोकादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला भारताबाहेरच्या एका नंबरवरून दहशतवादी हल्ला होण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई सध्या अलर्ट मोडवर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस विभागात यामुळे खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांना ही धमकी देण्यात आली आहे. भारताबाहेरच्या नंबरवरून हे मेसेज मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले आहेत.

Dolo 650 Uses: तापावर डॉक्टरांनी तुम्हाला दिली होती का Dolo-650? समोर आले धक्कादायक सत्य

या नंबरला ट्रॅक करण्यात येत असून यामुळे संपूर्ण पोलीस विभाग अलर्टवर आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here