Parbhani Crime News : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशात आता मुली घरातही सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. परभणीमध्ये पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

 

todays breaking news
परभणी : नातेवाईकांकडून अथवा ओळखीच्या व्यक्तीकडून मुलींसोबत वाईट कृत्य केल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र, परभणीच्या पाथरी तालुक्यातील हादगाव इथे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरामध्ये झोपले असताना वडिलांनी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये आईने दिलेल्या तक्रारीवरुन वडिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हदगाव इथे एक तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात पलंगावर झोपली होती. यावेळी त्या ठिकाणी मुलीचे वडील आले. मुलींनी एकटी पाहून त्यांनी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग केला. याला मुलीने विरोध केल्यानंतर वडिलांनी घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने झालेला प्रकार आपल्या आईला सांगितला.

Breaking News : रायगडनंतर मुंबई अलर्टवर! दिली २६/११ हल्ल्याची धमकी, पोलिसांना आला मेसेज
यानंतर मुलीच्या आईने पाथरी पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडीला विरोधात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाथरी पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घरामध्ये मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Dolo 650 Uses: तापावर डॉक्टरांनी तुम्हाला दिली होती का Dolo-650? समोर आले धक्कादायक सत्य

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here