पुणे : दहीहंडीच्या जल्लोष उत्साहात असताना पुण्यात सिंहगड रोड परिसरात नाचत असताना पूर्ववैमनस्यातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर धारधार शस्त्राने वार केले. तर यातील एका सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री वडगाव भागात घडली. शुभम जयराज मोरे (रा.महादेव नगर वडगाव ) असे जखमी झाल्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओंकार लोहकरे असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री सव्वासात ते साडेसातच्या सुमारास तुकाईनगर परिसरात असणाऱ्या कॅनॉल शेजारील रस्त्यावर घडली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मुख्यमत्र्यांचे अभिनंदन करणारे होर्डिंग, बॅनर न काढण्यासाठी आदेश? प्रकरण पोहोचलं कोर्टात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव मधील महादेव नगर येथील वेताळ मित्र मंडळ दहीहंडी उत्सवात शुभम जयराज मोरे हा त्याच्या मित्रांसोबत नाचत होता. यावेळी आरोपी चेतन ढेबे, ओंकार लोहकरे, अनुराग चांदणे, ज्ञानेश्वर जाधव, बाला धेबे, साहिल उघडे, वैभव साबळे व त्यांचे सात ते आठ मित्र यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मोरे याला मारहाण केली. यावेळी आरोपी लोहकरे याने त्याच्या जवळील पिस्तूलने हवेत गोळीबार केला.

त्यानंतर चेतन ढेबे याने मोरे याच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून जखमी केले. आरोपींनी मारहाण करत या भागात दहशत निर्माण केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी यातील आरोपी बाला ढेबे याच्यासह त्याच्या काही साथीदारांना तत्काळ पाठलाग करून पकडले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली.

आदित्य ठाकरे ही वेळ आली नसती, आता सर्व गेले; शिंदे सरकारमधील मंत्र्याचा सणसणीत टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here