नवी दिल्ली :शेती कामगार व ग्रामीण कामगार गटांसाठीची किरकोळ महागाई अनुक्रमे ६.६० टक्के व ६. ८२ टक्के झाली आहे. जुलै महिन्यात विशिष्ट अन्नपदार्थांच्या किमती वाढल्याने महागाईत वाढ झाली आहे. शेती कामगारांचा ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीएल-एएल) व ग्रामीण कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांकांमध्ये (सीपीएल-आरएल) वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेअंतर्गत e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख
जूनमधील स्थिती


– शेती कामगार गटाची किरकोळ महागाई ६.४३ टक्के

– ग्रामीण कामगार गटाची किरकोळ महागाई ६.७६ टक्के

देशाच्या विकास दराबाबत माजी गव्हर्नर सुब्बराव स्पष्टच बोलले; अर्थव्यवस्था…
जुलैमधील स्थिती

– गेल्या वर्षी जुलैमध्ये शेती कामगार गटाची किरकोळ महागाई ३.९२ टक्के

– गेल्या वर्षी जुलैमध्ये ग्रामीण कामगार गटाची किरकोळ महागाई ४.०९ टक्के

– अन्नपदार्थांची महागाई जुलैमध्ये या गटांसाठी अनुक्रमे ५.३८ टक्के व ५.४४ टक्के

– जूनमध्ये हे प्रमाण ५.०९ टक्के आणि ५.१६ टक्के

– गेल्या वर्षी जूनमध्ये या गटांसाठीच्या अन्नधान्याच्या महागाईचे प्रमाण २.६६ टक्के व २.७४ टक्के

US Recession: अमेरिकेत मंदीचे संकट, भारतावर काय होणार परिणाम; जाणून घ्या एका क्लिकवर
निर्देशांकांची वाटचाल

– शेतकरी कामगार व ग्रामीण कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकांत प्रत्येकी सहा अंकांनी वाढ

– शेती कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक १,१३१

– ग्रामीण कामगारांचा ग्राहक किंमत निर्देशांक १,१४३

– जून महिन्यात हे निर्देशांक अनुक्रमे १,१२५ व १,१३७

– शेती कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकांतील वाढ २० राज्यांत १ ते १३ टक्के

– तमिळनाडूत हा निर्देशांक सर्वोच्च १,३०१ इतका, तर हिमाचल प्रदेशात ८९० या नीचांकी पातळीवर

– ग्रामीण कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकातही २० राज्यांत १ ते १३ टक्के इतकी वाढ

– तमिळनाडूत तो १,२९० इतका सर्वोच्च, तर हिमाचल प्रदेशात ९४२ इतका नीचांकी

– या दोन्ही निर्देशांकांत आसाममध्ये सर्वाधिक १३ अंकांची वाढ

– तांदूळ, हिरव्या मिरच्या, भाजीपाला व फळांच्या किमती वाढल्याने या निर्देशांकांत वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here