राजस्थान : राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सुमेरपूर येथे दोन ट्रॅक्टर ट्रॉलींची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २५हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जनावरांनी भरलेलं ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला येऊन धडकली. या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला.

पाली जिल्ह्यातील सुमेरपूर पालडी राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. अपघातातील मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. अपघातानंतर जखमींना सुमेरपूर येथील रूग्णालयात तर काहींना शिवगंज येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील अंबाजी येथून रामदेवरा दर्शनासाठी भाविक ट्रॅक्टरने जात होते. मात्र, सुमेरपूरजवळ भाविकांवर काळाने झडप घातली.

मुख्यमत्र्यांचे अभिनंदन करणारे होर्डिंग, बॅनर न काढण्यासाठी आदेश? प्रकरण पोहोचलं कोर्टात
राजस्थानमधील हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. येथे अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांचा वेग निश्चित केला होता. मात्र, वाहनचालकांकडून सूचनांचे पालन होते नाही अशा प्रकारची तक्रार सतत होत आहे.

पुण्यातील शितोळे कुटुंबावर शोककळा; शाळेत जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा जागेवर मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here