नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत, म्हणजेच एप्रिल ते जुलै या काळात सोन्याची आयात गेल्या वर्षातील याच काळाच्या तुलनेत ६.४ टक्क्यांनी वाढली आहे. यंदा एप्रिल ते जुलै या काळात १२.९ अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले आहे. सोन्याच्या किरकोळ मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे सोन्याची आयात वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सांगितले आहे. गेल्यावर्षी याच काळात १२ अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले होते.

चिंता वाढवणारी बातमी! ५० % कंपन्यांची कर्मचारी कपातीची योजना, PWCच्या अहवालात माहिती

केवळ यावर्षीच्या जुलै महिन्याचा विचार केल्यास असे दिसून येईल की, या एका महिन्यात सोन्याची आयात जुलै २०२१च्या तुलनेत ४३.६ टक्के घसरली आहे. जुलै महिन्यात २.४ अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत देशाची व्यापारी तूट रुंदावत ३० अब्ज डॉलर झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात ही तूट १०.६३ अब्ज डॉलर होती.

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; देशात तांदूळटंचाईचे संकट, दरवाढीची शक्यता

भारत हा चीनंनतरचा जगातील सोन्याचा सर्वात मोठा दुसरा आयातदार देश आहे. या आयातीवर देशातील सराफांकडून दागिने घडवण्यासाठी लागणाऱ्या सोन्याचा मुख्यतः प्रभाव असतो. सोन्याची आयात जरी मोठ्या प्रमाणावर झाली असली, तरी रत्ने व दागिने यांची निर्यातही एप्रिल ते जुलै या काळात झाली आहे. या काळात रत्ने व दागिने यांच्या निर्यातीत गेल्यावर्षीच्या मानाने ७ टक्के वाढ होऊन ती १३.५ अब्ज डॉलर इतकी नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये रुंदावलेल्या व्यापारी तुटीचा दबाव चालू खात्यातील तुटीवरही येतो. यामुळे २०२१-२२मध्ये चालू खात्यातील तूट जीडीपीच्या १.२ टक्क्यांनी विस्तारली. २०२०-२१मध्ये चालू खात्यात जीडीपीच्या ०.९ टक्के अतिरिक्त रक्कम होती.

क्रेडिट, डेबिट कार्ड वापरता मग ही बातमी नक्की वाचा; RBI ने सर्वसामान्यांना केलेय हे आवाहन

यावर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये चालू खातील तूट कमी झालेली दिसली. ही तूट या काळात जीडीपीच्या १.५ टक्के, अर्थात १३.४ अब्ज डॉलर इतकी होती. त्याआधीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या तिमाहीअखेर ही तूट जीडीपीच्या २.६ टक्के, म्हणजेच २२.२ अब्ज डॉलर इतकी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here