संगमनेर : काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या संगमनेर येथील सुरेश थोरात यांच्यासह तब्बल ६० जणांवर पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशनादरम्यान भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘सागर बंगल्यावर वॉशिंग मशिनचे काम सुरू असावं’ असं म्हटलं होतं. याबाबतच्या वृत्तावर सोशल मीडियावर पिंपरणे येथील एका पत्रकाराने आक्षेपार्ह कमेंट केल्याचे पडसाद संगमनेरात उमटले. थोरात समर्थकांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात स्वानंद चित्तर यांच्याविरोधात बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शुक्रवारी (१९ ऑगस्ट) रोजी स्वानंद चित्तर यांचे भाऊ डॉ. विवेक चित्तर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाणे गाठत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय नातेवाईक असलेल्या सुरेश थोरात यांच्यासह आणखी ६० जणांवर बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावमध्ये तणाव; बॅनर फाडल्याने शिवसैनिकांमध्ये संताप

डॉ. विवेक चित्तर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुरेश थोरात यांच्यासह अन्य ५० ते ६० जणांनी आमच्या घरी येऊन आमच्या कुटुंबियांना दमबाजी केली. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, कोयते व कुऱ्हाडी होत्या. तर माझ्यावर पिस्तुल रोखून, तू आणि तुझा पत्रकार भाऊ याला जीवे मारून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे. त्यावरून थोरात यांच्याविरोधात, अनधिकृत जमाव गोळा करुन दंगल घडवून आणणे, घरात घुसून मारहाण करणे व बेकायदा पिस्तुल बाळगण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईला ६ जण उडवणार, पाकिस्तानहून पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज; वाचा काय लिहलं

दरम्यान, २०१९ मध्ये सुरेश थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते आणि राज्याचे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मूळ जोर्वे गाव हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघात येते. त्यामुळे तिथे स्थानिक पातळीवर परस्परविरोधी राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यातूनच हा प्रकार घडला आहे की यामागे आणखी काही कारणे आहेत, हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here