पुणे : नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने पश्चिम बंगालमधील दोन मुलींना पुण्यात आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आरोपीने पीडित मुलींच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन २०२० मध्ये त्यांना पुण्यात आणले. आरोपी मदी रेड्डी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात फरासखान्यासह पश्चिम बंगालमधील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी; तसेच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील अजिंक्य शिर्के यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.