Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 20, 2022, 12:30 PM
Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील विडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रतिक्षा खोलीत काल सायंकाळी एका महिलेची प्रसूती झाली यात जन्मलेल्या नवजात बाळ दगावले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे.

हायलाइट्स:
- पीएचसीच्या दारातच प्रसुती नवजात बाळ दगावले
- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार
शुभांगी सुदर्शन हापसे ( वय २१ ) ही महिला प्रसुतीसाठी माहेरी विडुळ येथे आली होती. शुक्रवारी तिचे वडील माधव सावंतकर यांच्यासह ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचली. त्यावेळी तेथे कोणीच उपस्थित नव्हते पण प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर त्यात नवजात बाळ दगावले.
या घटनेनंतर नागरिकांनी रोष व्यक्त केला. सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही आरोग्याची दैना अवस्था झाली आहे. शुक्रवारी प्रतीक्षालयातच महिलेची प्रसूती होऊन बाळ दगावल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर काही काळाने डॉक्टर तेथे पोहोचले त्यांनी बाळ व महिलेला उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णाला रवाना केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network