सोलापूर : सोलापूरात एका चोराला चोरी करणे चांगलचं माहागात पडलं आहे. ते म्हणजे चोरी करून पळत असताना या चोरट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करताना ग्रामस्थांनी चोरट्यास रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ पकडतील या भीतीपोटी चोरट्याने धूम ठोकली. चोराला पळत असताना विहीर न दिसल्याने संशयीत चोर विहिरीत पडला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीतील चोरट्याचा मृतदेह बाहेर काढले. मृतदेहास शवविच्छेदनासाठी शासकीय विश्रामगृहात दाखल केले.

चोराने गावात धुमाकूळ घातला होता

अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोराने गावात धुमाकूळ घातला होता. या चोराने गावातील राहुल बगले आणि दादाराव चव्हाण यांची घराची दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि घरातील रोख रक्कमासह दागिने घेऊन बाहेर चोर जात असताना गावातील युवक कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागली.

आधी केला सेक्स, मग लागली पैशांची भूक; महिलेच्या पतीस रंगेहात पकडलं
चोरट्याने जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी ठोकली

गावातील युवकांनी चोराचा पाठलाग सुरू केला. चोराचा आणि युवकातील पाठलागीचा खेळ बराच काळ सुरू होता. गावकऱ्यांनी चोराचा पाठलाग सुरूच ठेवला चोर गावकऱ्याच्यां तावडीतून सुटण्यासाठी वाटेल ते मार्ग निवडून तो पळू लागला होता. या पळापळीत चोरट्याने रस्ता समजून गावातील पाटील यांच्या विहिरीतच उडी मारली. गावातील युवकांनी ताबडतोब अक्कलकोट पोलिसांशी संपर्क साधला तोपर्यंत चोरट्याला विहिरीतच जीव गमवावा लागला.

पोलिसांच्या मदतीने संशयीत चोरट्याचा मृतदेह काढला बाहेर

घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब काकडे उपनिरीक्षक प्रवीण लोकरे पोलीस नाईक मल्लिकार्जुन गोटे, पांढरे आदी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, गावातील युवक कार्यकर्त्यांची ग्रामस्थांकडून माहिती घेतल्यानंतर मदत कार्याला सुरुवात झाली. विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी जीवरक्षकांना बोलवण्यात आले. दोन मोटारीच्या साहाय्याने विहिरीतील पाणी काढण्यात आले. त्यानंतर जीवरक्षकाना बोलवण्यात आले होते. जीवनरक्षक मल्लिकार्जुन धुळखेडे, श्रीकांत बनसोडे, प्रवीण जेऊरे, तेजस मेत्रे, महेश रेवणे व इतर सहकारी ग्रामस्थ पोलीस प्रशासनाच्या मदतीने अखेर १८ तासाच्या प्रदीर्घ शर्थीनंतर पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांना मृतदेह बाहेर काढण्यास यश आले.

शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल

संशयीत चोरट्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनसाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. ग्रामस्थांनी देखील मोठी गर्दी केली होती. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदे सरकारकडून एकनाथ खडसे यांना मोठा धक्का; पत्नी मंदाताई खडसे यांच्या अडचणीत वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here