गोंदिया : प्रेम प्रकरणांमधून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशात गोंदियांमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रेमिकेवर नाराज होऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गोंदियातील एव्हरग्रीन हाँटेलमध्ये घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एव्हरग्रीन हाँटेलमध्ये आत्महत्येची ही तिसरी घटना असून या हाँटेलमध्ये घडत असलेल्या सततच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहेत. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रियकराचे शतक जांगडे २३ वर्ष रा. आंबाटोली फुलचुर, गोंदिया असे नाव आहे.

Dolo 650 Uses: तापावर डॉक्टरांनी तुम्हाला दिली होती का Dolo-650? समोर आले धक्कादायक सत्य
घटनेच्या दिवशी शतक हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी एव्हरग्रीन हाँटेलमध्ये पोहोचला. जिथे त्यांनी एकांत मिळवा म्हणून रूमही बुक केली. या दरम्यान, दोघांमध्ये काही कारणावरूण भांडण सुरू झाले. या भांडणातून शतकने सोबत आणलेले विष प्राशन केले. ज्याची माहिती प्रेयसीने होटलच्या कर्मचार्‍यांना दिली. त्यांनी तात्काळ शतकला गोंदियातील खासगी रूग्णालयात दाखल केले जिथे त्यावर उपचार सुरू असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

आधी केला सेक्स, मग लागली पैशांची भूक; महिलेच्या पतीस रंगेहात पकडलं
एव्हरग्रीन हाँटेलमधील गेल्या आठ महिन्यात आत्महत्येची ही तिसरी घटना असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह लागले आहे. अशात प्रेयसीचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मुंबईला ६ जण उडवणार, पाकिस्तानहून पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज; वाचा काय लिहलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here