सोलन/चंबा : महाराष्ट्रातसह देशात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात हिमाचल प्रदेशात १२ तासांपासून धुवांधार पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कालका शिमला राष्ट्रीय महामार्ग सोलन जिल्ह्यातील कंडाघाटजवळ बंद करण्यात आला आहे. इथे दरड कोसळल्याची माहिती आहे. त्याच वेळी, चंबा इथे ४० जणांना घेऊन जाणारी पंजाब रोडवेज बस थोडक्यात बचावली आहे. या घटनेचा भीषण फोटो सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सोलन जिल्ह्यातील कांदाघाटजवळ दरड कोसळली. यामुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे. चंबा जिल्ह्यातील डलहौसी भागातील पंचकुलामध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. पंजाब रोडवेजची बस रस्त्याच्या कडेला लोंबकळली होती. सुदैवाने ही बस बचावली. या बसमध्ये ४० हून अधिक प्रवासी होते. ही बस डलहौसीहून जालंधरला जात होती. खराब हवामान असून धुक्यामुळे हा अपघात झाला तर सध्या सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
Breaking News : रायगडनंतर मुंबई अलर्टवर! दिली २६/११ हल्ल्याची धमकी, पोलिसांना आला मेसेज मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात मोठं नुकसान झालं आहे. कांगडा इथं ब्रिटीशकालीन चक्की रेल्वे पूल तुटला आहे. तर मंडी जिल्ह्यातील गोहर येथील प्रधान यांच्या घरावर भूस्खलन झाले. यामध्ये एकूण सात सदस्यांचा ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला. आतापर्यंत कोणीचाही मृतदेह हाती लागलेला नाही.