अनेक व्हॉट्सअप ग्रूप आणि सोशल मीडियामध्ये या व्हिडिओमुळे सवाल उपस्थित केले जात आहेत. हा सगळा प्रकार अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातला. धारमी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांवर कोणाचाच वचक नसल्याचं सांगत आहे. दारू पिऊन शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांसमोरच विचित्र अवस्थेत झोपी गेलेल्या या शिक्षकावर कारवाई करण्याचीही मागणी केली जात आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक शिक्षक वर्गात झोपलेला आहे. त्याचे पाय टेबलावर आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या शिक्षकाला कसलचं भान नाहीये. वर्गातील विद्यार्थी देखील वर्गाबाहेर फिरताना दिसत आहेत. वर्गातले सरच मद्यधुंद अवस्थेत आल्यामुळे विद्यार्थीही गोंधळलेले दिसत आहेत. अशातच एक इसम मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत या शिक्षिकाला जाग करतो. त्याला प्रश्न विचारतो. त्यानंतर हा शिक्षक वर्गातील हलत-डुलतच बाहेर जातो. धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षिकाने चक्क जीन्समध्येच लघुशंकाही केलेली दिसत आहे.