वाशी: भोंदूबाबानं एका मजुराला शाप देण्याची भीती दाखवली. दारूच्या आहारी गेलेल्या मजुराला दाखवलेली भीती भोंदूबाबाच्या जीवावर बेतली. भोंदूबाबाच्या शापापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मजुरानं बाबालाच संपवलं. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या क्राईम युनिटनं आरोपी मजुराला अटक केली आहे. घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

१४ ऑगस्टला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी वाशीच्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये एका भोंदूबाबाचा मृतदेह आढळून आला. रामनारायण लालसा उर्फ गुरुदेव असं बाबाचं नाव होतं. तो मूळचा उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या गोला तालुक्यामधील दादरी गावचा रहिवासी होता. भोंदूबाबाच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथकं तयार केली होती.
माझ्या जीवावर मजा मारली, केस स्ट्रेटनिंग केले! प्रेयसीमुळे कर्जबाजारी तरुणाचं टोकाचं पाऊल
मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक मजुरांशी संवाद साधला. आसपास असलेल्या सीसीटीव्हींचं फुटेज तपासलं. याशिवाय खबऱ्यांचीदेखील मदत घेतली. बाबाच्या सोबत एक मजूर असायचा. त्याला दारूचं व्यसन होतं. बाबानं या मजुराचा इतर मजुरांसमोर अपमान केला होता. माझं ऐकलं नाहीस तर शाप देईन, अशी धमकी त्यानं त्याच्या सोबत असणाऱ्या मजुराला दिली होती, अशी माहिती पोलिसांना तपासातून समजली.

पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आणि पुराव्यांच्या आधारे अरुणकुमार भारती नावाच्या मजुराला अटक केली. अरुणकुमार मूळचा उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील मनकापूर तालुक्याचा रहिवासी आहे. अरुणकुमारला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. पुन्हा दारू पिऊन आलास तर तुला शाप देईन अशी धमकी बाबानं १३ ऑगस्टला मला दिली होती, असं अरुणकुमारनं चौकशीत सांगितलं.
आता १० हजार देते, ५० नंतर; पण माझा मुलगा संपला पाहिजे! आईनंच दिली मुलाच्या हत्येची सुपारी
बाबा आपल्याला शाप देईल अशी भीती आरोपीला होती. त्यामुळे त्यानं बाबाला संपवायचं ठरवलं. अरुणकुमारनं बाबाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला. त्यामुळे बाबाचा मृत्यू झाला. अरुणकुमारनं पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला २४ ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here