जळगाव : शिवसेनेसोबत गद्दारी करून हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. मंत्रीपद मिळेल चांगलं खाते मिळेल अशी अपेक्षा गद्दारांना होती. मात्र, यांना काय मिळालं तर ‘बाबाजीचा ठुल्लू’, असं म्हणत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पार पडली. या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी वैशाली सूर्यवंशी यांनी आदित्य ठाकरे यांना औक्षण करत हातावर राखी बांधली. मोठ्या जल्लोषात आदित्य ठाकरे यांचे यावेळी स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळाले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात म्हणाले की ५० थरांचे दहीहंडी फोडली ५० थरांची दहीहंडी फोडली की ५० इतर काही घेतलं. ५० खोके यांनी घेतले मलाई यांनी खाल्ली मात्र सामान्य जनतेला काय मिळालं तर काहीच नाही, असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांना असं वाटत असेल की शिवसेनेसोबत कोणी नाही. त्यात त्यांनी आता या ठिकाणी यावे आणि ही गर्दी पहावी की आजही किती लोक शिवसेनेसोबत आहेत. हे तुमचं प्रेम तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद घ्यायलाच मी आलो आहे असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

विनायक मेटेंच्या पत्नीला सत्तेत घ्या, शिवसंग्राम संघटनाही आग्रही, फडणवीसांकडे मागणी
गेल्या दोन महिन्यांमध्ये जे घाणेरडे राजकारण झालं ते कुणालाही पटलेलं नाही. स्वर्गीय आर. ओ. पाटील यांनाही ते पटल नसत, गद्दारी करणं सोप असतं आमिषाला बळी पडणं ही सोपं असतं, मात्र पक्ष सोबत एकनिष्ठ राहणार निश्चितच कठीण असतं. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला.

थोडीशी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या

शिवसेनेला संपवण्याचाच नव्हे तर ठाकरे कुटुंबीयांना संपवण्याचं राजकारण सध्या महाराष्ट्रत सुरू आहे. गद्दार जेव्हा गुवाहाटी आणि गोव्यामध्ये फिरत होते, त्यावेळी ते स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होते. मात्र, यावेळी या सर्व गद्दारांनी मस्ती करत महाराष्ट्राची लाज घालवली असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिंदे गटात सहभागी बंडखोर आमदारांवर केला. जिथे आहे तिथे आनंदाने राहा मात्र थोडीशी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या व निवडणूक लढा असं आवाहनही आदित्य ठाकरे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यासह बंडखोर आमदारांना दिलं. मातोश्रीचे दरवाजे यांच्यासाठी कायम उघडे राहतील.

एक दिवस पुन्हा पाचोरा यावं लागेल

आगामी काळात शिवसेनेकडून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात येईल असे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच एक संपूर्ण दिवस पुन्हा या वैशाली ताईसाठी पाचोर्‍यात यावे लागेल असही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

चार दिवस बेपत्ता, पाचव्या दिवशी कालव्याशेजारच्या झाडाला लटकता मृतदेह, नेमकं काय घडलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here