मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली आहे. यामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत. अशात हवामान खात्याने पुन्हा एकदा मुंबईसह महत्त्वाच्या शहरांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भंडारा, गोंदिया चंद्रपूर गडचिरोली व नागपूर या पाच जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे काही नद्यांना महापूराचा धोका असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तण्यात आला आहे.

Breaking News : रायगडनंतर मुंबई अलर्टवर! दिली २६/११ हल्ल्याची धमकी, पोलिसांना आला मेसेज
राज्यात येत्या २४ ते ४८ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे तर उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट असून यावेळी मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Dolo 650 Uses: तापावर डॉक्टरांनी तुम्हाला दिली होती का Dolo-650? समोर आले धक्कादायक सत्य
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचं वादळात रुपांतर झाल्यामुळे नजिकच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अशात नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

VIDEO : बघता बघता क्षणात वाहून गेला अख्खा पूल, थोडक्यात बचावली बस; अंगाचा थरकाप उडवणारे दृष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here