हातामध्ये कुऱ्हाड घेऊन पोलीस चौकीमध्ये प्रवेश करून पोलिसांची दुचाकी पेटवून दिल्याची घटना परभणीत घडली. पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या राणीसावरगाव चौकीमध्ये हा प्रकार घडला. यावेळी धिंगाणा घालणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता आरोपीने पोलिसावर हल्ला करून शिवीगाळ केली.

पोलिसांनी पाहणी केली असता आलिम तांबोळी हा पोलीस चौकीजवळ दिसला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून पळून गेला. यावेळी पोलिसांना चौकीमध्ये लावलेली दुचाकी जळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता आलिम तांबोळी हातात कुऱ्हाड घेऊन पोलीस चौकीचा विद्युत पुरवठा खंडित करत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून त्याने पोलीस चौकी जाळण्याच्या उद्देशाने पोलिसांची दुचाकी पेटवून दिली. पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी परमेश्वर मंत्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून आलिम तांबोळी यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.