मुंबई: महागाई वाढत असताना आता सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी एक भार पडणार आहे. मोबाईल रिपेरिंग करणं महागणार आहे. मोबाईलच्या डिस्प्लेपासून सिम कार्ड ट्रे, पॉवर बटणपर्यंत सगळ्याचंच रिपेरिंग महाग होणार आहे. केंद्र सरकारनं मोबाईल पार्ट्सवर १५ टक्के बेसिक कस्टम ड्युटी (बीसीडी) लावण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डानं (सीबीआयसी) याची माहिती दिली आहे.

सेल्युलर मोबाईल फोनच्या डिस्प्ले असेंब्ली आयातीबद्दल अफवा पसरल्याचं सीबीआयसीनं सांगितलं. सध्या मोबाईल फोनच्या डिस्प्ले असेंब्लीवर १० टक्के सीमा शुल्क लागतं. डिस्प्ले असेंब्लीमध्ये टच पॅनलपासून कव्हर ग्लास, एलईडी बॅकलाईट आणि एफपीसीचा समावेश होतो. मोबाईल फोनची डिस्प्ले असेंब्ली केवळ धातू किंवा प्लास्टिकच्या बॅक सपोर्ट फ्रेमसोबत आयात होत असल्यास त्यावर १० टक्के बीसीडी लागेल. मात्र मेटल/प्लास्टिकची बॅक सपोर्ट फ्रेमदेखील सोबत आयात केल्यास त्यावर १५ टक्के बीसीडी लावण्यात येईल. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास डिस्प्ले असेंब्लीसाठी वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवर आता स्वतंत्रपणे कर लागेल. हा कर आधी लावला जात नव्हता.
UPI की डिजिटल वॉलेट; ऑनलाइन पेमेंटसाठी कोणता आहे सर्वात सुरक्षित पर्याय जाणून घ्या…
सिम ट्रे, पॉवर, सेन्सर, स्पीकर, फिंगर प्रिंट, एँटिना पिन, स्पीकर नेट, पॉवर की, स्लाईडर स्विच, बॅटरी कम्पार्टमेंट, व्हॉल्यूम यांच्यासाठीचं फ्लेक्सिबल प्रिंटेड सर्किट (एफपीसी), डिस्प्ले असेंब्लीसोबत धातू/प्लास्टिकची बॅक सपोर्ट फ्रेम आयात करण्यात आल्यास पूर्ण असेंब्लीवर १५ टक्के बीसीडी द्यावी लागेल. याचा अर्थ तुम्ही पूर्ण फ्रेमसोबत तुम्ही डिस्प्ले बदलत असल्यास तुम्हाला पार्ट्सवर आधीपेक्षा अधिक पैसे द्यावे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here