राजस्थानच्या हनुमानगढमध्ये दोन सख्ख्या भावांचा अपघात झाला आहे. सायकलवरून जात असलेल्या भावंडांना भरधाव कारनं धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही भाऊ २० फूट हवेत उडाले. अपघातानंतर चालक फरार झाला.

दोन्ही भावांच्या मित्रानं हा अपघात पाहिला. तो सायकल उभी करून दोघांच्या जवळ पोहोचला. त्याचवेळी पेट्रोल पंपवरील कर्मचारीदेखील तिथे आले. त्यांनी जखमी भावंडांना रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना बिकानेरला हलवण्यात आलं. तिथे दोघांवर उपचार सुरू आहेत. दोन्ही मुलांच्या डोक्याला इजा झाली असून अनेक ठिकाणी फ्रॅक्चर आहे. अपघातानंतर चालक फरार झाला. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीनं त्याचा शोध घेत आहेत.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलांचे वडील चालक म्हणून काम करतात. या प्रकरणी अद्याप तरी पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही चालकाला अटक झालेली नाही. राजस्थानच्या अनेक शहरांमध्ये स्पीडोमीटर लावण्यात आलेले आहेत. मात्र तरीही अपघात कमी झालेले नाहीत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.