वी दिल्ली: अमेरिकेचा माजी स्टार बॉक्सर माइक टायसनचे जगभरात लाखो चाहते आहेत. या सर्व चाहत्यांसाठी एक अत्यंत दु:खद अशी बातमी आहे. माईक टायसन यांची तब्येत खूपच खालावली असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर त्यांना स्व:च्या पायावर उभं राहाणंही कठीण झालं आहे. त्यामुळे यंदा ते व्हीलचेअरवरच असतात (Mike Tyson).

५६ वर्षीय माइक टायसनची ही स्थिती सतत गांजा (Cannabis) घेण्याने झाल्याचं सांगितले जात आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, माइक टायसन दर महिन्याला गांजावर सुमारे ३२ लाख रुपये खर्च करतात. टायसन त्यांच्या ४२० एकर शेतात हा गांजा पिकवतात. त्यासाठी त्यांनी कायदेशीर मान्यताही घेतली आहे.

हेही वाचा –बाळाने ‘त्याला’ पप्पा म्हणावं की दादा? पाहा ही महिला काय करुन बसलीये…

गांजाच्या व्यसनामुळे जीव धोक्यात

माईक टायसनचे फार्म अमेरिकेतील (America) दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये (South Carolina) आहे. जिथे ते ४२० एकर शेतात गांजाची शेती करतात. माइक टायसनच्या गांजाच्या व्यसनामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. नुकत्याच झालेल्या पॉडकास्टमध्ये माईक टायसनने सांगितले की, त्यांची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. आता माईक टायसन व्हीलचेअरवर दिसत आहेत. हे बघून त्यांच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. टायसनचा शेवटचा अधिकृत सामना जून २००५ मध्ये झाला होता आणि माजी हेवीवेट चॅम्पियनने १९९६ नंतर एकही विजेतेपद जिंकलेले नाही.

mike tyson

माइक टायसन

हेही वाचा –सहकाऱ्याने इतकी घट्ट मिठी मारली की तिच्या बरगड्यांची हाडंच तुटली, महिला थेट कोर्टात

टायसन मियामी विमानतळावर व्हीलचेअरवर दिसले

सध्या माइक टायसन यांचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये तं मियामी इंटरनॅशनल एअरपोर्टवर व्हीलचेअरवर दिसत आहे. त्यांच्या हातात काठीही दिसली. काही दिवसांपूर्वी माईक टायसन न्यूयॉर्कमध्ये काठीच्या मदतीने चालताना दिसले होते. या सर्व फोटोंवरून माईक टायसन यांची प्रकृती ठीक नसल्याचे दिसून येत आहे. टायसन यांच्या पाठीला दुखापत झाल्याचे सांगितले जात असले तरी यामुळे ते व्हीलचेअरवर दिसत आहेत. माईक टायसनला बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला आहे.

हेही वाचा – लग्नाची स्वप्नं रंगवली, डेस्टिनेशन वेडिंगसाठी दोघे निघाले; विमानतळावर स्वप्नांचा चुराडा

विमानात प्रवाशाला मारहाण

नुकताच माईक टायसन यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये ते विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाला मारहाण करताना दिसत आहेत. माईक टायसनने प्रवाशाला जबर मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. २० एप्रिल रोजी ही बाब समोर आली होती. त्यावेळी माईक टायसन सॅन फ्रान्सिस्कोहून फ्लोरिडाला जेटब्लू विमानाने जात होते.

विनायक मेटे, राकेश झुनझुनवाला यांचं निधन तर बीड आणि विरार घटनेत ८ लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रासाठी ब्लॅक संडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here