उस्मानाबाद: तुळजापुर तालुक्यात शुक्रवारी रात्री दुर्दैवी घटना घडली. कसई येथील वीटभट्टी चालक सचिन पांडुरंग बनसोडे हे गुलबर्गा इथून कसईकडे आपल्या स्विफ्ट कारने येत होते. आरळी ब्रुद्रुकपासून ४ किमी पुढे गेल्यानंतर त्यांना अचानक कारचा ब्रेक दाबला. त्यानंतर त्यांची कार रस्त्याशेजारी असलेल्या खड्ड्यात पडली.

विशेष म्हणजे कसई गाव केवळ दीड किलोमीटरवर असताना ही दुर्घटना घडली. प्रसंगावधान राखत सचिन बनसोडे यांनी पायाने काच तोडली. सचिन यांच्या सोबत कारमध्ये त्यांची पत्नी अंकिता (वय २७), मुलगी तृप्ती आणि तनुजा होत्या. सचिन यांनी पायाने कार फोडत तनुजाचा हात पकडून तिला बाहेर काढले. तर दुसऱ्या मुलीचा हात सुटल्यामुळे ती कारमध्येच राहिली.
भरधाव कारची सायकलला धडक; दोन सख्खे भाऊ हवेत २० फूट उडाले; थरकाप उडवणारा अपघात
कार पाण्यात बुडाल्यामुळे पत्नी अंकिता आणि मुलगी तृप्ती यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सचिन बनसोडे यांनी मदतीसाठी खूप प्रयत्न केले. परंतु रस्ता निर्मनुष्य असल्यामुळे मदतीसाठी कोणीच नव्हते. थोड्या वेळाने तिथून एक कार जात होती. कार चालकाने झालेला प्रकार कसई गावात सांगितला. त्यानंतर कसई गावातील लोक मदतीसाठी धावून आले.

ग्रामस्थानी पाण्यात बुडालेली कार बाहेर काढली. कारमध्ये अंकिता या मृत अवस्थेत आढळून आल्या. परंतु तृप्ती आढळून आली नाही. त्यानंतर तुळजापुर येथील अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले. त्यांनी तृप्तीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह सापडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here