video viral : हार्दिक पंड्याचा स्वॅग काही वेगळाच असतो. सध्याच्या घडीला हार्दिक हा सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. पण यामध्ये त्याचा रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे. हार्दिकने स्वत:साठी एक व्हिला बुक केल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हार्दिकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि हा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे.

हार्दिकच्या आयुष्यात बरेच चढ उतार पाहायला मिळाले आहेत. हार्दिक एकेकाळी भारतीय संघाला अविभाज्य भाग समजला जायचा. त्यानंतर हार्दिकला दुखापत झाली आणि त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. यानंतर हार्दिकला गोलंदाजी करता येत नव्हती. त्यामध्येच त्याच्या फलंदाजीतील फॉर्मही चांगला राहीला नाही. त्यामुळे हार्दिक भारताच्या संघात राहणार नाही, असे म्हटले जात होते. हार्दिकला काही सामन्यांसाठी वगळण्यातही आले. त्यानंतर हार्दिकसाठी पर्याय शोधले जाऊ लागले होते. हार्दिक त्यानंतर काही काळ विश्रांताी घेण्यासाठी संघाबाहेर गेला होता. हार्दिक आता पुन्हा भारताच्या संघात परतणार नाही, असे सर्वांना वाटत होते. पण हार्दिकने फिटनेससाठी चांगलाच घाम गाळला. त्यानंतर काही कालावधीत तो गोलंदाजीही करायला लागला.
हार्दिकच्या आयुष्याला मोठे वळण मिळाले ते आयपीएलमुळे. या आयपीएलमध्ये गुजरातचा नवा कोरा संघ उतरणार होता आणि त्याचे कर्णधारपद हार्दिककडे देण्यात आले होते. हार्दिकने यावेळी कुशल नेतृत्व केले. यावेळी त्याची फलंदाजी आणि गोलंदाजीही चांगली झाली. त्याचबरोबर हार्दिकने चांगला संघ बांधला आणि त्याचेच फळ त्याला मिळाले. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यानंतर हार्दिकची भारतीय संघात एंट्रीही झाली. जेव्हा आयर्लंडच्या दौऱ्यासाठी संघ निवडण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा हार्दिककडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत हार्दिकने संघातील स्थान कायम राखले आहे आणि आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात तो संघाचा एक भाग होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.