Pune Dahihandi News: सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका दहीहंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत गोविंदा दहीहंडी फोडायला चढला असता खालचे थर कोसळल्यावर किमान 40 सेकंद हडीहंडीलाच लटकून पडलेला दिसतो. पुण्यातील  दगडूशेठ मंदिराच्या परिसरात सुवर्णयुग या मंडळाची ही दहीहंडी होती. या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.

पुणेकरांनी अनुभवला थरार

प्रथमेश कारळे असं या गोविंदाचं नाव आहे. तो पुण्यातील गणेश मित्र मंडळ या पथकाचा गोविंदा आहे. दगडूशेठ मंदिराच्या परिसरात असलेल्या सुवर्णयुग या दहीहंडी फोडायला गणेश मित्र मंडळ मोठ्या उत्साहाने थर लावण्यासाठी पोहचले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पुणेकर दोन वर्षांनी दहीहंडी साजरी करत होते. या पुणेकरांचा उत्साह पाहून  गणेश मित्र मंडळातील गोविंदांचा उत्साह देखील शिगेला पोचला होता. सुवर्णयुग दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचे प्रयत्न सुरु होते. एकावर एक थर लावत जल्लोषात दहीहंडीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत होते. आजुबाजूला असलेल्या प्रचंड गर्दीत जल्लोषाने गोविंदांनी सहा थर लावले. या थरात सगळ्यात टोकावर दहीहंडी फोडायला प्रथमेश चढला. त्याचाही उत्साह शिगेला पोचला होता. प्रथमेश टोकाला चढला जोरात दहीहंडी फोडली. मात्र काही सेकंदातच दहीहंडीचे खालचे थर कोसलळे आणि प्रशमेश वर दहीहंडीला अडकून पडला. किमान 40 सेकंद तो फुटलेल्या दडीहंडीला लटकला होता. 

प्रथमेश बीबीएचं शिक्षण घेत आहे. मागील सात वर्षांपासून तो दहीहंडीचा सराव करतो आहे. गोविंदा होणं मोठं जोखमीचं काम असतं. यात जीवाला हानी होऊ शकते हे माहित असूनसुद्धा महाराष्ट्रातील अनेक तरुण उत्साहनं दहीहंडी फोडण्यासाठी सहभाग होतात. दोन वर्षांनी यंदा दहीहंडी मोठ्या उत्साहाने साजरी होणार असल्याने गणेश मित्र मंडळाच्या पथकाला देखील उत्सुकता होती. मागील तीन महिने हे पथक सराव करत होतं. नियमित व्यायामासोबतच रोज नवे थर लावत आत्मविश्वास वाढवत होते. पहिल्यांदा सात थर लावण्याचा सराव केला मात्र तो फोल ठरला. त्यानंतर सहा थर उत्तम लावून जल्लोषात दहीहंडी फोडण्यासाठी पथक मैदानात उतरलं होतं.

मला भीती वाटली नाही
प्रथमेश 40 सेकंद दहीहंडीला लटकला होता. दोन बोटांच्या साहय्याने लटकून होता. हा थरार खाली असलेल्या अनेकांनी अनुभवला अनेकांना भीती वाटली मात्र मला मात्र भीती वाटली नाही. गोविंदा आहो काम जोखमीचं असलं तरी खेळाच्या माध्यातून आपल्या हातून कृष्णाची सेवा घडत आहे. मला माझ्या सहकाऱ्यांवर विश्वास होता. 40 सेकंदांनी मी खाली उडी मारली त्यावेळी त्यांनी हाताची जाळी केली होती आणि मी नीट खाली आलो, असं तो सांगतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here