मुंबई: दहीहंडीवरून उत्सवावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेले राजकारण आता सण संपल्यानंतरही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण, आता शिवसेनेने भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या जांबोरीतील दहीहंडीमुळे मैदानाची वाट लागल्याचा आरोप केला आहे. जांबोरी मैदानात दहीहंडी आयोजित केल्यामुळे याठिकाणी वाहने आणण्यात आली. तसेच दहीहंडीच्या दिवशी जांबोरीवर (Jambori Ground) मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मैदानातील वॉटर स्प्रिंकलर्स, वॉटर ड्रेनेज सिस्टीमचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पुढील काही महिने जांबोरी मैदान खेळण्याच्या लायकीचे राहिलेले नाही, असा आरोप शिवसेनेकडून (Shivsena) करण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजप यावर काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल. (Shivsena slams BJP leader Ashish Shelar)
वरळीच्या आमदाराने शहाणपणा शिकवू नये, शेलारांचा आदित्य ठाकरेंवर थेट हल्ला
आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे तीन आमदार, एक खासदार आणि पालिकेतील शिवसेनेचे बडे नेते वरळी परिसराचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून आशिष शेलार यांनी दहीहंडीसाठी जांबोरी मैदान मिळवले होते. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली होती. त्यामुळे आता दहीहंडीचा सण संपल्यानंतरही शिवसेनेने आशिष शेलार यांच्यावर जांबोरी मैदानाची वाट लावल्याचा आरोप केला आहे. गोविंदा मंडळाचे ट्रक आणि नेत्यांच्या अलिशान मोटारी जांबोरी मैदानात घुसल्याने मैदानात खड्डे पडून वॉटर स्प्रिंकलर्स उखडले गेले. दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी मैदानात कचऱ्याच्या गोणी, पुष्पगुच्छ, भाजपचे बॅनर्स, उरलेले खाद्यपदार्थ आणि घाणीने मैदानाचा उकीरडा झाला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी दीड-दोन कोटी रुपये खर्च करून जांबोरी मैदानाचा केलेला सर्व विकास फुकट गेला, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

दहीहंडीसाठी येणाऱ्या वाहनांसाठी मैदानात लाल मातीवर बारीक खडी टाकण्यात आली. ट्रक मैदानात घुसल्याने याठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशी नाराज झाले आहेत. आशिष शेलार यांनी त्यांच्या वांद्रे मतदारसंघातील रंगशारदा नाट्यगृहाच्या मागे विंग्ज अरिना फुटबॉल मैदान बांधले आहे. वरळीऐवजी त्यांच्या फुटबॉल मैदानात किंवा बीकेसी अथवा बोरिवलीत वाजपेयींच्या नावाने उभारलेल्या मैदानात शेलार यांनी दहीहंडी उत्सव का आयोजित केला नाही, असा सवाल मुंबई जिल्हा फुटबॉल संघाचे कार्यकारिणी सदस्य अनुप दुबे यांनी विचारला.
Aditya Thackeray : आशिष शेलार आदित्य ठाकरेंविरोधात वरळीतून विधानसभा लढवणार?

मला पोरकट राजकारण करायचे नाही: आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात शेलार यांनी रचलेल्या या दहीहंडीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगील होती. याविषयी आदित्य ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता ते म्हणाले की, दहीहंडीला मी अनेक ठिकाणी फिरणार आहे. या उत्सावाची वेगळीच मजा असते. हीहंडीसाठी जांबोरी मैदान मिळावं यासाठी आम्ही अर्ज केलाच नव्हता. आजचा अनंदाचा दिवस आहे. तो सर्वांनी उत्साहात साजरा करावा. यामळे पोरकट राजकारणात मला पडायचं नाही, असे सांगत आदित् ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे आशिष शेलार यांना टोला लगावला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here