Maharashtra Politics | आदित्य ठाकरे हे तरुण आहेत. त्यावेळी त्यांनी अशाच पद्धतीने राज्यभर दौरे करायला हवे होते, अशी आमची अपेक्षा होती. मात्र त्यांनी तसं केलं नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. मात्र आमची त्यावेळची इच्छा अपेक्षा आदित्य ठाकरे आता पूर्ण करत आहेत. गुलाबराव पाटलांचं ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंनी तह केला पाहिजे होता.
हायलाइट्स:
- उद्धव ठाकरे यांनी तह केला असता तर शिवसेना फुटली नसती
- मी त्यांच्याकडे २० आमदार घेऊन गेलो होतो
- सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली होती
शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने प्रहार केले जात आहेत. शिंदे गटातील आमदार गद्दार कसे आहेत, हे वारंवार सांगितले जात आहे. शिंदे गटाकडूनही या टीकेचा तितक्याच जोरकसपणे प्रतिवाद केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुलाबराव पाटील यांनी बंडाच्या काळातील जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. उद्धव ठाकरे यांनी तह केला असता तर शिवसेना फुटली नसती. मी त्यांच्याकडे २० आमदार घेऊन गेलो होतो. सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली होती. पण उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत ऐकले नाही आणि ही वेळ आली, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. तेव्हाच तह झाला असता तर ही वेळ आली नसती. आदित्य ठाकरे आता राज्यभरात फिरत आहेत. ते ३२ वर्षांचे तरुण आहेत. मंत्री असताना त्यांनी राज्यात फिरावे, हेच आम्ही सांगत होतो. पण आदित्य ठाकरे आताही राज्यभरात फिरत असतील, तर परमेश्वर त्यांचं भलं करो, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
‘आम्ही गद्दार नाही, आम्ही खुद्दारच’
यावेळी गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांनाही प्रत्युत्तर दिले. आम्ही जो प्रयत्न केला तो शिवसेना वाचवण्यासाठीच केला. मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आदित्य ठाकरे यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network