अहमदनगर : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होत अनेक नागरिकांना आपल्या घरांवर तिरंगा फडकविला. मात्र, त्याची मुदत संपून गेल्यानंतरही अनेकांनी तो उतरविलेला नाही. यातून राष्ट्रध्वजाचा अपमान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर घर लंगर सेवेतर्फे रविवारी नगर शहरात असे ध्वज उतरविण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे, अशी माहिती हरजितसिंग वधवा यांनी दिली.

वधवा यांनी सांगितले की, हर घर तिरंगा मोहिम द्वारे १३ ते १५ ऑगस्टपर्यंत घरांवर देशाचा तिरंगा फडकिवण्याची परवानगी होती. परंतु, आज देखील अनेक घरांवर हा तिरंगा दिवसरात्र फडकत आहे. नियमाप्रमाणे राष्ट्रध्वज तिरांग्याला १५ ऑगस्ट सायंकाळीच सन्मानपूर्वक खाली घेऊन घडी करून चांगल्या ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. अनेकांनी तसे केले नसल्याने आपल्या सन्मानाचे मान जाऊ नये म्हणून रविवारी (२१ ऑगस्ट) घर घर लंगर सेवेच्या टीम शहरात राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरण्याची मोहीम हाती घेत आहे.

मुंबईला उडवण्याच्या धमकीनंतर पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई, विरारमधून एकाला अटक
तसेच काही राष्ट्रध्वज फाटले असून काही रस्त्यावर देखील माखलेल्या स्थितीत असल्यास आपण सन्मानपूर्वक ते गोळा करण्यात येणार आहेत. घर घर लंगरचे सेवादार आपल्या दारात आल्यास सहकार्य करावे. तसेच आपण स्वतः देखील आपल्या घरचे किंवा आजू बाजूचे तिरंगा सन्मानपूर्वक खाली घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

VIDEO : बघता बघता क्षणात वाहून गेला अख्खा पूल, थोडक्यात बचावली बस; अंगाचा थरकाप उडवणारे दृष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here