पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात झाला तेव्हा पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमधील सदस्यही त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. मनीषा महाडिक (५९), मुलगा मुकेश (३२), नातू सिद्धार्थ (११) आणि नातेवाईक शीतल भुवड (४२) आणि त्यांची मुलगी अनिता (२२) हे किरकोळ जखमी झाले. या सर्वांची प्रकृती खालावल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फ्लॅट क्रमांक २०२ हा दयाशंकर विश्वकर्मा यांच्या मालकीचा असून, त्यांनी तो सुमारे एक वर्षापूर्वी महाडिकांना भाड्याने दिला होता.
महत्त्वाचं म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) मोडकळीस आलेल्या इमारतींच्या यादीत या इमारतीचं नाव नाहीये. बरं इतकंच नाहीतर विश्वकर्मा यांनी एक वर्षापूर्वीच त्यांच्या फ्लॅटचे फ्लोअरिंग बदलले होते. त्यामुळे हा प्रकार कसा घडला याबद्दल अद्याप काहीही कळू शकलं नाही.
महाडिक रात्री अकराच्या सुमारास झोपायला गेले होते. ते झोपेत असताना मोठा आवाज झाला आणि ते पहिल्या मजल्यावर कोसळले. आवाजाने इमारतीतील रहिवासी जागे झाले. अग्रवाल हॉलकडे धावले आणि तिथे त्यांना पाच जण दिसल्याने त्यांना धक्काच बसला. विश्वकर्मा यांनी केलेल्या फ्लोअरिंगच्या कामावरही कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. अशात अग्रवाल यांनी सांगितलं की त्यांच्या छताला कोणतीही तडे गेले नव्हते.