काय आहे नेमका वाद?
झोमॅटोच्या या जाहिरातीत हृतिक म्हणतो की, मला खूप भूक लागली होती, म्हणून मी महाकालमधून थाळी मागवली. उज्जैन महाकालेश्वर मंदिराचा संदर्भ देत सोशल मीडियावर ही जाहिरात व्हायरल केली जात आहे. त्यामुळं वाद निर्माण झालाय.
या जाहिरातीत हृतिक अनेक छोट्या मोठ्या शहरांची नावं घेतो. यात एका उज्जैनचाही उल्लेख आहे. फूड डिलिव्हरी बॉयकडून पार्सल घेतल्यानंतर हृतिक त्याला म्हणतो की थाळी खायची इच्छा झाली, मग काय, उज्जैनमध्ये आहे म्हणून महाकालमधून ऑर्डर केली.
ही जाहिरात पाहिल्यानंतर महाकाल मंदिरातील पुजाऱ्यांनी या जाहिरातीचा विरोध केला आहे. महाकाल मंदिरातून अशा कोणत्याही थाळीची डिलिव्हरी केली जात आहे. मंदिर परिसरात भाविकांसाठी मोफत जेवणाची सोय केली जाते. असं मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितलं.
माफी मागावी
हृतिक रोशनच्या या जाहिरातीमुळं अफवा पसरत आहेत. मंदिरातील थाळीची ऑनलाइन डिलिव्हरी होत आहे, असा गैरसमज लोकांमध्ये परसत आहे. त्यामुळं ही जाहिरात मागं घ्यावी, तसंच हृतिकनं माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे.
झोमॅटोवर व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ डिलिव्हर केले जातात. असं असताना महाकाल नावाचा वापर करणं थांबवलं पाहिजे, असंही अनेकांनी म्हटलं आहे. नाही तर कायेदशीर कारवाई करण्यात येईल असं मंदिरातील पुजाऱ्यांनी म्हटलं आहे.