potholes on roads | शर्मिला ठाकरे या पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मी दुसऱ्या पक्षांवर टीका करणार नाही. माझा मुलगा काय करतो, नवरा काय करतो, यावर मी लक्ष ठेवून असते, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

 

Sharmila Raj Thackeray
शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे

हायलाइट्स:

  • आपण देशाला सर्वात जास्त महसूल देतो तर निदान रस्ते तर चांगले करा
  • महाराष्ट्राची हद्द सोडली तर सगळ्या राज्यांत सगळे रस्ते गुळगुळीत आहेत
  • आपले राजकारणीच का मुद्दाम रस्ते करत नाहीत
पुणे : महाराष्ट्रातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा प्रश्न राज्यात नेहमीच चर्चिला जातो. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी देखील नाराजी व्यक्त करत “माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील”, असं वक्तव्य केलं आहे. त्या पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. (Sharmila Thackeray in Pune)

महाराष्ट्र काय एवढा मागासलेला नाहीये. महाराष्ट्राची हद्द सोडली तर सगळ्या राज्यांत सगळे रस्ते गुळगुळीत आहेत. आपले राजकारणीच का मुद्दाम रस्ते करत नाहीत ? तेवढे तरी नीट करा. असा संताप शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तर आपण देशाला सर्वात जास्त महसूल देतो तर निदान रस्ते तर चांगले करा असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. दरम्यान, माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील असं देखील ठाकरे म्हणाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली तर…; गिरीश बापटांचं महत्त्वाचं वक्तव्य
तरुण पिढी राजकारणात आलीच पाहिजे

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या संदर्भात देखील शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या राजकरणात तरुण पिढी आलीच पाहिजे. तरुण पिढीकडे नवीन चांगले विचार असतात जुन्या विचाराने ते चालत नाहीत. त्यांच्या भरपूर अपेक्षा असतात त्यांच्या वयाच्या मुलांना काय हवं असत हे त्यांना माहिती असते. जवळपास ६० ते ७० टक्के मतदार तरुण आहेत. त्यामुळे या मतदारांना काय हवंय हे या पिढीला कळतं म्हणून तरुण पिढीने राजकारणात यायला हवं असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांना मनसेचा टोला, ‘डोंबिवलीतील खड्ड्यांत दुचाकी चालवणे यालाही साहसी खेळाचा दर्जा द्यावा’
दुसरीकडे, मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिलेला संधी मिळाली नाही यावर देखील शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात भरपूर चांगल्या महिला आहेत. आत्ता कुठे पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यामुळे पुढे मंत्रिमंडळात महिला नक्की येतील, अशी आशा शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

मी दुसऱ्या पक्षांवर टीका करणार नाही. माझा मुलगा काय करतो, नवरा काय करतो, यावर मी लक्ष ठेवून असते, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here