जळगाव : जळगाव शहरातील बीबा नगर इथे महिलेला घराचे दोन्ही दरवाजे उघडे ठेवून झोपले चांगलेच महागात पडले आहे. शनिवार २० ऑगस्ट रोजी पहाटे १ ते साडे पाच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घरातून दागिण्यांसह रोकड असा एकूण ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळी उठल्यानंतर प्रकार लक्षात आल्यानंतर प्रमिला चौधरी यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे हे करीत आहेत.