कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथे भटक्या कुत्र्यांनी एका १३ वर्षीय मुलीवर हल्ला करत मुलीचे हात पाय डोक्याचा चावा घेत अक्षरशः कान फाडून काढलेत. अपूर्वा अण्णाप्पा शिरढोने असे या मुलीचे नाव असून जखमी अपूर्वाला उपचारासाठी मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले असून या घटनेने पुन्हा एकदा दत्तवाड गाव भीतीच्या छायेखाली आहे. तर येथील ग्रामस्थांनकडून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबतची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मिळतात त्यांनी या प्रकरणाची तत्काळ माहिती घेत संबंधित मुलीच्या वडिलांशी त्यांनी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद देखील साधला आहे. तसेच उपचाराचा संपूर्ण खर्चाची जबाबदारी ही त्यांनी उचलली असून सदर रुग्णास जे काय उपचार लागतील ते सर्व करण्यात यावे अशी सूचना ही सावंत यांनी हॉस्पिटल प्रशासनास दिली आहे. (six dogs attacked a 13 year-old girl)

दत्तवाड येथील धक्कादायक घटना

शिरोळ तालुक्यातील दत्तवाड टाकळीवाडी रोड लगत दानत बियर बार शेजारील असलेल्या शेतामध्ये भुईमूग पिकावर फवारणी करण्यासाठी गेलेले शेतकरी आप्पासो शिरढाने यांना चहा व नाश्ता देण्यासाठी त्याची मुलगी अपूर्वा शिरढोणे (वय वर्ष अंदाजे १३) शेतामध्ये जात होती. यावेळी भटक्या कुत्र्यांनी सदर मुलीवर हल्ला केला. यामध्ये तिच्या हातापायांना आणि डोक्याला कुत्र्याने चावा घेऊन एका बाजूचे कान फाडून काढले. किमान पाच ते सहा कुत्र्यांचा टोळक्याने मुलीवर हल्ला केल्याने मुलगी गंभीर जखमी झाली.

शिवसेनेने प्रथमच थोपटले दंड, शिंदे गटही देणार टक्कर; कोल्हापुरात रंगणार राजकीय दहीहंडीची इर्ष्या
मात्र येथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्या कुत्र्यांना हकलवून लावत सदर मुलीला दत्तवाडातील ग्रामीण रुग्णालयात नेले. येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामपंचायतीने तात्काळ अशा घटनांची गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावी अशी मागणी केली आहे.

आरोग्यमंत्र्यांनी घेतली घटनेची दखल

दरम्यान, या घटनेनंतर जखमी मुलीला मिरज येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मिळतात त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच सदर मुलीचे वडील आप्पासो शिरढाने यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे या संपूर्ण प्रकाराची माहिती घेत जखमी मुलीच्या संपूर्ण उपचाराचा खर्च देखील त्यांनी उचलला आहे. तसेच सिव्हील हॉस्पिटलच्या प्रशासनाशी बोलून जखमी मुलीला आवश्यक ते उपचार पुरवण्यात यावेत असे सूचनाही सावंत यांनी डॉक्टरांना केली आहे. तसेच येथील प्रशासनाशी बोलून भटक्या कुत्र्यांवर बंदोबस्त करण्यात यावे अश्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here