मंडणगड तालुक्यातील उंबरशेत, वेळास, बाणकोट, भोसाळे,आंबडवे, पेवेकोंडसह, दापोली, हर्णे, पंचनदी, पाग, आडे, आंजर्ले, मुरूड, जुवेरी मोहल्ला, लाडघर, कर्जाळू आदी गावात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्हयातील शेवटचे टोक असलेले रायगड जिल्हयाच्या हद्दीला लागून असलेल्या मंडणगड तालुक्यातही वादळामुळं हाहाकार माजला आहे.
मंत्री उदय सामंत यांनी आज मंडणगड, दापोलीभागात पाहणी केली. पुढील दोन दिवस मंडणगड दापोलीमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी उदय सामंत मुक्काम करणार आहेत. अन्न-धान्य आदी व्यवस्था जिल्हाप्रशासन करत असली तरी ते स्वतःही या मदत कार्यात हातभार लावणार आहेत. जिल्हयातील सेवाभावी संस्थांना त्यांनी नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावांना मदतीची हाक दिली आहे. स्वतः रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सुध्दा सर्व यंत्रणांना मदतीचे आवाहन करत या गावातील ग्रामस्थांना धिर दिला आहे.
यागावांमधील नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून पुढील दोन दिवसात नुकसानीचा अहवाल येताच ४८ तासांत अर्थसहाय्य करून या गावातील नागरिकांना पुन्हा उभं करण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिलं आहे.
मंडणगड,दापोली खाडीपट्टयातील १२ हजार स्थलांतरितांना सुरक्षेच्या कारणास्तव एकत्रित ठेवावं लागल्यामुळं विलगीकरण करता आलं नव्हतं. त्यामुळं या सर्वांची राकोरोना चाचणी, स्वॅब तपासणी होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितलं.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines