मुंबई-मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र आहे. चाहते या जोडप्याची प्रत्येक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. दोघे कधी लग्न करणार हे जाणून घेण्याचा त्यांच्या चाहत्यांचा प्रयत्न असतो. मात्र या जोडप्याने अद्याप लग्नाची घोषणा केलेली नाही. लवकरच दोघेही लग्नाच्या गाठी बांधू शकतात. मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे आणि वयातील अंतरामुळे ती रोज चर्चेत असते. पण मलायकाच्या लग्नाच्या वेळी अर्जुन कसा दिसत होता हे तुम्हाला माहीत आहे का?

जिया खान प्रकरणात अडकला सूरज पांचोली? अभिनेत्याने सत्य लपवले

लग्नात अर्जुन कसा दिसत होता?

अरबाज मलायकाच्या प्रेम कहाणीची चर्चा एकेकाळी बरीच रंगली होती. पहिल्या भेटीतच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अरबाज आणि मलायकाने जवळपास पाच वर्ष डेट केलं. बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. १९९८ मध्ये अरबाज आणि मलायका यांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केलं. पण या लग्नात अर्जुन कसा दिसत होता हे तुम्हाला माहीत आहे का?

malaika-arbaaz arjun

२०१७ मध्ये घटस्फोट

२५ वर्षीय मलायकाने लग्नाच्या चार वर्षांनी म्हणजेच २००२ मध्ये मुलाला जन्म दिला. जवळपास दीड दशक दोघांचे वैवाहिक जीवन चांगलेच चालले, मात्र त्यानंतर दोघांमधील अंतर वाढू लागले आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. परिणामी २०१७ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत असल्याचं कळलं आणि नंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली.

सोनमला मुलगा होणार हे अनिल कपूर यांना आधीच माहित होतं? त्या पोस्टमध्ये केला होता नातवाचा उल्लेख

दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या लग्नाला आता पाच वर्षांहून अधिकचा काळ झाला. पण त्यांच्यापैकी कोणीच दुसरं लग्न केलेले नाही. पण दोघेही त्यांच्या नात्यात खूप आनंदी आहेत. सध्या अरबाज खान २२ वर्षांनी लहान मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. तर मलायकाही अर्जुनसोबत तिच्या लव्ह लाईफचा आनंद घेत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here