गुहागर : आईवरुन शिवी दिली म्हणून डोक्यात कुऱ्हाड मारुन सुनील आग्रेने मित्र अनंत तानु मांडवकर याचा शनिवारी सायंकाळी खून केल्याने मोठी खळबळ उडाली. रविवारी सकाळी चिखली मांडवकरवाडी परिसरातील एका पायवाटेवर अनंत मांडवकरचा मृतदेह सापडल्याने ग्रामस्थही हादरले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवत अवघ्या दोन तासात गुहागर पोलीसांनी संशयित आरोपी सुनील महादेव आग्रे (वय ४५ वर्षे) याला अटक केली आहे. (holding the anger of verbally abusing the friend murdered the friend)

त्या दोघांची मैत्री आणि स्वभावातील तापटपणा या सगळ्याचा संशय आल्याने सुनील आग्रे याच्या घरात पायऱ्यांवर आणि भिंतीवर लागलेले रक्त पुसलेली जमीन यावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आपले लक्ष सुनील आग्रेवर केंद्रीत केले. सुनील आग्रेच्या घराची कसून तपासणी केली असता घराचे दार, छत्री आणि पायरीवर रक्ताचे डाग दिसून आले. घरामधील जमीन नुकतीच पुसून काढल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या व अवघ्या दोन तासात या तपासात मोठे यश मिळवले. सुरुवातीला चौकशीच्या वेळी सुनील आग्रेने या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत होता.

दहीहंडी उत्सवात शोककळा; उत्साहात नाचतानाच हृदयविकाराच्या झटक्याने गोविंदाचा मृत्यू
विशेष म्हणजे चिखली मांडवकरवाडी येथे रहाणारे अनंत तानू मांडवकर (वय ४८ वर्षे) आणि सुनील महादेव आग्रे (वय ४५ वर्षे) हे दोघेही मित्र होते. शनिवारी (ता. २० ऑगस्ट) सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान अनंत आणि सुनील यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी अनंतने सुनीलला आईवरुन शिवीगाळ केली. त्याचा राग येवून सुनीलने अनंतच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. यामध्ये अनंत जागीच ठार झाला. ते पाहून सुनील आपल्या घरात गेला. आपल्या हातून अनंताचा खून झालाय हे कळल्यावर रात्री उशिरा सुनीलने अनंतचा मृतदेह मांडवकरवाडीतील एका पायवाटेवर आणून टाकला. घरी येऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेत तिकीट देण्यासाठी सोन्याची चेन आणि पैशांच्या बॅगा कोण मागत होते?; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप
रविवारी सकाळी काही ग्रामस्थांना पायवाटेवर पडलेला अनंताचा मृतदेह दिसला. तातडीने ग्रामस्थांनी ही माहिती पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी ही गोष्ट गुहागर पोलीस ठाण्यात कळवली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, राजेश धनावडे, वैभव चौगले, प्रतीक रहाटे, हनुमंत नलावडे, आनंदराव पवार, स्वप्नील शिवलकर, तडवी, गणेश कादवडकर, घोसाळकर, फुटक हे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाचपुते यांनी पोलीसांच्या टीम करुन एकाचवेळी घटनास्थळ व घराची तपासणी करणे, ग्रामस्थांकडूनही माहिती घेणे वैगेरे आदी तपासकाम गतीने करण्यात आले.

दोघे बाइकवरून जात होते, अचानक बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली, पुढे घडले ते…
चिखली मांडवकरवाडीतील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अनंत आणि सुनील हे दोघेही तापट व भांडखोर स्वभावाचे होते. दोघांचे आपल्या कुटुंबाबरोबर, ग्रामस्थांबरोबर पटत नव्हते. चिखली मांडवकरवाडी येथे हे दोघेही स्वत:च्या घरात एकटे रहात होते. एकाच ठिकाणी कामाला जात असल्याने या दोघांची मैत्री होती.

याबाबत सुनील योग्य प्रकारे माहिती देऊ शकला नाही. आपण दोषी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे असे कळल्यावर सुनीलने खुनाची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here