घटस्फोटोच्या चर्चा सुरू झाल्यानंतर युझवेंद्र आणि धनश्री दोघांनीही या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र बाकी काही बोलणं त्यांनी टाळलं होतं. त्यानंतरही चर्चा काही थांबल्या नाहीत. आता धनश्रीनंच लांबलचक पोस्ट शेअर करत या सगळ्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हटलंय धनश्रीनं तिच्या पोस्टमध्ये?
धनश्रीनं तिच्या पोस्टमध्ये सांगितलं की, डान्स करताना तिच्या पायाला दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर असल्यानं पुन्हा डान्स करायचा असेल तर शस्त्रक्रिया करावीच लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही. आता पुढचे कित्येक महिने मला डान्स करता येणार नाही. त्यामुळं सध्या मी वेदना सहन करतेय. घरातही वावरताना त्रास होतोय.
चर्चा ठरल्या त्रासदायक
पायाच्या दुखापतीमुळं आधीच मला खूप त्रास सहन करावा लागतोय. त्यात डान्स करता येणार नसल्यानं ते दु:ख आणखी जास्त आहे. असं असताना आमच्या नात्याबद्दल उलटसुटल चर्चा सुरू झाल्या, आणि या त्रासात आणखी भर पडली.
धनश्री पुढं म्हणते, की या घटनेमुळं मी खूप काही शिकलेय. आता मी पहिल्यापेक्षा जास्त कणखर आणि समजूदार झालीय. या कठिण काळात माझा नवरा, कुटुंबिय माझ्या सोबत आहेत. यासगळ्यातून मी लवकरच बाहेर पडेन. असं ती म्हणाली आहे.