Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 21, 2022, 9:37 PM

सिनेसृष्टीतील कलाकारांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरू असते. कधी त्यांच्या मालिका, सिनेमे तर कधी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहते बोलत असतात. कलाकारांचे हटके फोटोही याचाच एकभाग. अनेकदा अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

 

marathi actor childhood photos
मुंबई: टीव्ही किंवा चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचे ग्लॅमरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. पण चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी ते कसे दिसायचे याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. अनेक कलाकारांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो व्हायरल होताना दिसतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा फोटो पाहून मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याला ओळखणंही कठिण असल्याचं अनेकांनी म्हटलं.
सध्या मी आयुष्यातील सर्वात कठीण…लांबलचक पोस्ट शेअर करत धनश्रीनं खरं काय ते सांगूनच टाकलं
सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड सुरू असतात , असाच एक नवा ट्रेंड सेलिब्रिटीही फॉलो करताना दिसत आहेत. यात आपला जुना फोटो आणि सध्याचा फोटो शेअर करायचा असतो. म्हणजेच गेल्या काही वर्षात आपण किती बदललो , हे दाखवण्यासाठी हा ट्रेंड सुरू आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता रोहन गुजर यानंही हा ट्रेंड फॉलो करत चाहत्यांसोबत त्याचा जुना फोटो शेअर केलाय. कोण होतास तू काय झालास तू…अशा कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी केल्यात.

रोहनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो काही टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण त्याला खरी ओळख ही ‘होणार सून मी या घरची ’ या मालिकेमुळं मिळाली. त्यानं ही मालिका मी अडीच वर्ष केली. मनोज कोल्हटकर, आशा शेलार आणि तेजश्री प्रधान असं आम्हा चौघांचं नातं चांगलं जुळून आलं होतं. पण ती मालिका संपल्यावर, चित्रपट, मालिका, नाटकात त्याला तशाच भूमिका येऊ लागल्या होत्या. भावांच्या जवळपास वीस ते पंचवीस भूमिकांना त्यानं नकार दिला. एका चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यानंतर एक डान्स शोही केला होता.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here