अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघ व बडनेरा विधानसभा मतदारसंघातील पुढील उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर निवडून आलेले असतील, असं सूचक विधान आज अमरावती येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. हे विधान करतात उपस्थित तरुण व अमरावती करांच्या भुवया उंचावल्या.

अमरावती लोकसभा मतदार संघातून २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा विजयी झाल्या तर आमदार रवी राणा सुद्धा याच बडनेरा मतदारसंघातून आमदार म्हणून अपक्ष निवडून आले.

महाविकास आघाडी सरकार असताना आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा वरून उद्धव ठाकरे यांच्यावर रान उठवलं. आज दहीहंडी स्पर्धेत बोलताना रवी राणा यांनी म्हटले की भविष्यात जिल्ह्यातील पाच आमदार हे भारतीय जनता पार्टीचे असतील तर महानगरपालिका महापौर व जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल त्याला युवा स्वाभिमान पार्टी भक्कम पाठिंबा देईल, असं म्हटलं.

UPI Payment Charges : यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार का? केंद्र सरकारनं जाहीर केली भूमिका

युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आयोजित दहीहंडी स्पर्धेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे मनाली की अमरावती लोकसभा आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघातील पुढील उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडून आलेले असते. यावरून भारतीय जनता पार्टीने अप्रत्यक्षरीत्या राणा यांना अपक्ष पाठिंबा न देता भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढण्याची तयारी ठेवा तरच आपला घरोबा असा इशारा दिला आहे.

Ind vs Pak: इरफान पठाणचं पाकिस्तानच्या वकार युनिसला सडेतोड प्रत्युतर, म्हणाला, बुमराह तर…

२०१९चं चित्र कायं?

अमरावती मध्ये २०१४ ते २०१९ पर्यंत जेवढा विकास झाला त्यावर नंतर बोलू २०१४ मध्ये देवेंद्र साहेब आपल्यासोबत नव्हते त्यामुळं मी या लोकसभा मतदारसंघाची खासदार झाली नाही. मात्र, २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यासोबत होते, त्यामुळं खासदार झाले यात शंका नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.
ओबीसी राजकीय आरक्षण ९२ नगरपालिकांमध्ये लागू होणार? सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here