मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कार्यालयात वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे रेल्वेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

 

mumbai local train
करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत (file photo )
मुंबई : भायखळ्याच्या अलिकडील स्टेशन करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील अनेक प्रवाशांना तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. भायखळ्याजवळ एक्स्प्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचं सांगण्यात येत आहे. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. सीएसएमटीकडे जाणारी रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

एक्स्प्रेस ट्रेनमागे अनेक लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना कार्यालयात जाण्यात उशिर होत असल्याने करीरोड येथे त्यांनी जलद लोकलमधून उड्या घेऊन धीमी लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. पण धीम्या लोकलची सीएसएमटीला जाणारी वाहतूकही रखडल्याचं सांगण्यात येत आहे. रेल्वेकडून याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here