Humiliation for Farmers | शेतकऱ्याने १३०० रुपये खर्च केले पण व्यापाऱ्याने हातावर फक्त ९.५ रुपये दिले. त्यामुळे शेतकऱ्याला हसावे की रडावे, असा प्रश्न पडला. हा प्रकार शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडला आहे. नैसर्गिक संकटांवर मात करून हिंमतीने पीक काढले तरी बाजारात त्या मालाला कस्पटासमान किंमत मिळाल्याचा एक प्रकार नुकताच पुणे जिल्ह्यात समोर आला आहे.

हायलाइट्स:
- दोन एकरांत घेतले पीक
- पीक घेण्यासाठी सर्व खर्च एकूण १३०० रुपये
- विक्रीतून रक्कम फक्त साडेनऊ रुपयेच मिळाले
येथील शेतकऱ्याने उसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून फ्लॉवर हे पीक दोन एकरमध्ये घेतले होते. त्यात फ्लॉवरच्या सतरा पिशव्या त्यांनी मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी पाठवल्या होत्या. हे पीक घेण्यासाठी सर्व खर्च एकूण १३०० रुपये इतका आला असून त्याची विक्रीतून रक्कम फक्त साडेनऊ रुपयेच मिळाले. त्यामुळे शेतकऱ्याला हसावं की रडावं अशी त्याची परिस्थिती झाली आहे. आम्हाला मिळालेले ते साडेनऊ रुपये पुन्हा चेकद्वारे व्यापाऱ्याला पाठवणार असल्याचे संबंधित शेतकऱ्याने सांगितले आहे.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी तरकरी उत्पादक शेतकरी म्हणून ओळखला जातो. या भागात मोठया संख्येने तरकरी पिके घेतली जातात. यावरच शेतकऱ्याचा उदरनिर्वाह असतो.यात शेतकरी शिरूर या भागात मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी आदी पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. सर्व खर्च वजा जाता केवळ साडे नऊ रुपये आल्याने शेतकऱ्याची आर्थिक नुकसान झाले आहे.एवढा खर्च करूनही हाती फक्त साडेनऊ रुपये आल्याने शेतकरी हताश झाला असून एवढा खर्च करूनही हाती काही न लागल्याने त्याने पीक घ्यावे की नाही असा प्रश्न त्याच्या समोर पडला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network