गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अहेरी आगारातील एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बसमध्ये जवळपास २० ते २५ विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या अपघातात वाहकासह विद्यार्थी गंभीर झाले असून जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘मानव विकास मिशन’ अंतर्गत बसेस चालवल्या जातात. मुलचेरा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अहेरी आगारातून जवळपास ४ ते ५ बसेस जातात. आज सकाळच्या सुमारास अहेरी-लगाम-मुलचेरा जाणारी एमएच-०७ सी-९४६५ क्रमांकाची एसटी बस लगाम परिसरातील शांतिग्राम, लगाम, कोलपल्ली, कोठारी, मल्लेरा येथून विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना या बसला चाची नाल्याजवळ अपघात झाला.

हरिहरेश्वर बोट प्रकरणी ४८ तासानंतर भाजप नेत्याचा खळबळजनक दावा, सांगितले घातपाताचे धागेदोरे

मल्लेरा गाव ओलांडल्यानंतर चाची नाल्याजवळ एसटी बस रस्त्याच्या कडेला थेट जंगलात जाऊन झाडाला आदळली. या अपघातात बसचालक आणि वाहक तसेच काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व जखमींना मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

मोदींकडून अपेक्षा….पण खरे मोदी कोणते? भावना गवळींसोबतच्या फोटोवरून शिवसेनेचा ‘रोखठोक’ वार

दरम्यान, अहेरी उपविभागातील बकाल रस्त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नियमित बस सेवा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागत आहे. त्यातच अहेरी आगारातून प्रवाशांसाठी सोडल्या जाणाऱ्या अनेक बसेसची अवस्था दयनीय आहे. रस्त्यावरच बिघाड होणे, धावत्या बसचे पार्ट निघून जाणे, डिझेल संपणे आणि अपघात होणे हे नित्याचेच झालं आहे. त्यामुळे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या एसटी बसचा प्रवासही आता धोकादायक झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here