Supreme Court on BMC Election 2022: शिंदे-भाजप सरकात अस्तित्वात येताच २०१७ मध्ये ज्या २२७ वॉर्डनुसार निवडणुका झाल्या होत्या. त्याच पद्धतीने निवडणुका घेण्याचा अध्यादेश शिंदे सरकारने काढला होता. तर यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने या वॉर्ड पुर्रचनेसंदर्भात निर्णय घेत २३६ वॉर्ड पाडत निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर राज्यात सत्तांतर झालं.

हायलाइट्स:
- वॉर्ड पुनर्रचनेवरुन शिंदे-भाजप सरकारला झटका
- वॉर्ड फेरबदलाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
- मुंबईत २३६ वॉर्डनुसारच निवडणुका होणार
शिंदे-भाजप सरकात अस्तित्वात येताच २०१७ मध्ये ज्या २२७ वॉर्डनुसार निवडणुका झाल्या होत्या. त्याच पद्धतीने निवडणुका घेण्याचा अध्यादेश शिंदे सरकारने काढला होता. तर यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने या वॉर्ड पुर्रचनेसंदर्भात निर्णय घेत २३६ वॉर्ड पाडत निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. सरकार येताच हा निर्णय बदलण्यात आला.
त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेवर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरेंना दिलासा देत या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारवर माजी मंत्री धनंजय मुंडेंचा निशाणा
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network