झी मराठीच्या ‘उंच माझा झोका’ पुरस्कार सोहळ्यासाठी (Unch Maza Zoka Awards 2022) पंकजा मुंंडे महत्त्वाची जबाबदारी हाताळताना दिसणार आहेत. या कामामध्ये त्यांना मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिची साथ लाभणार आहे.
हे वाचा-फिल्मफेअरचा कंगना रणौतला मोठा झटका; मॅगझिनवर केलेले आरोप भोवले
झी मराठीच्या मंचावर प्रेक्षकांच्या मनोरंजनाप्रमाणे त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणारे कार्यक्रम सादर केले जातात. ह्या वर्षी देखील मला अभिमान आहे हे ब्रीद घेऊन स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ‘उंच माझा झोका’ या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ‘उंच माझा झोका’ पुरस्कार सोहळ्याचे आठवे वर्ष आहे. विविध स्तरावर समाजकार्य करण्यात महिला अग्रेसर आहेत. त्यांच्या कार्याने समाजाला सुदृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. समाज वैचारिकरित्या समृद्ध करण्यासाठी त्यांचे कार्य महत्त्वाचे ठरते. अशा विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव‘उंच माझा झोका’ या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
हे वाचा-रिलीज आधीच लीक झाली ‘ब्रह्मास्त्र’ची कथा, रणबीरची होणार फसवणूक
या पुरस्कार सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर सांभाळणार आहेत. पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर ह्या दोघींची जुगलबंदी ह्या कार्यक्रमात रंगत आणेल ह्यात शंकाच नाही. त्यामुळे पंकजा मुंडे एक नवी जबाबदारी सांभाळताना यावेळी दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी झी मराठीवरील कार्यक्रम ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमातीलही त्यांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

‘उंच माझा झोका पुरस्कार २०२२’ हा कार्यक्रम २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. या कार्यक्रमात कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार पाहता येणार आहेत.