murder news today, पतीचा गळा आवळून फेकलं झुडपात पण तो जिवंतच होता; पत्नीने बॉयफ्रेंडसोबत जे केलं वाचून हादराल – attempted murder of husband by wife with help of lover in washim news today
वाशिम : रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका महिलेचे आपल्या आते भावासोबत अवैध संबंध होते. या अवैद्य संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने गळा आवळून हत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
दादासाहेब नावाचे एक ३५ वर्षीय व्यक्ती पत्नी, दोन मुली व एका मुलासह देगाव येथे राहतात. पत्नीचे तिच्या आते भावासोबत अवैध संबंध होते. यावरून पती आणि पत्नीत नेहमीच खटके उडायचे. त्यामुळे दादासाहेबांचे आई-वडीलही नाराज होते आणि सुनेच्या या प्रेम प्रकरणाला विरोध करायचे. काही दिवसांपूर्वी याच गोष्टीवरून दादासाहेब आणि पत्नीच्या प्रियकरामध्ये भांडण झालं होतं. २० ऑगस्ट रोजी रिसोड तालुक्यातील बिबखेडा या गावी मिस्त्री कामासाठी मुलगा गेला असता रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नसल्याने दादासाहेबांच्या वडिलांनी सुनेकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही महिती मिळाली नाही. हरिहरेश्वर बोट प्रकरणी ४८ तासानंतर भाजप नेत्याचा खळबळजनक दावा, सांगितले घातपाताचे धागेदोरे रात्र उलटूनही तरी तो परत आला नसल्याने गावातील नागरिकांनी या व्यक्तीचा शोध सुरू केला. गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने रिसोड, बीबखेडा येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यामध्ये प्रियकराने त्याला दुचाकीवरून रिसोडकडे नेल्याची बाब उघड झाली. हा प्रकार प्रियकराला समजताच त्याने स्वतःला शिरपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आणि पोलिसांसमोर कबुलीही दिली.
शिरपूर पोलिसांनी प्रियकराला रिसोड पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रियकर आणि प्रेयसीने पतीचा गळा आवळून त्याला रिसोड लोणी मार्गावरील एका ढाब्या पासून काही अंतरावर असलेल्या झुडपात फेकून दिलं असल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमी अवस्थेत पतीला रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वाशीम येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. आता येथे पतीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा नियम मोडला, अनेकांनी घरावरचा तिरंगा उतरवलाच नाही; आता? याबाबत जखमींच्या वडिलांनी रिसोड पोलिसात तक्रार दिल्याने सून आणि तिच्या प्रियकरा विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला ठाणेदार देवेंद्र सिंग ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह आढावा घेऊन पंचनामा करत जखमींचा मोबाईल टिफिन आणि इतर साहित्य ताब्यात घेतलं. घटनेचा पुढील तपास रिसोड पोलिस करत आहेत.