इंदूर : सध्या प्रेम प्रकरणांमधून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाला ऑनलाईन प्रेमात पडणं चांगलंच महागात पडलं आहे. हा व्यापारी पत्नीसोबत युरोप टूरवर गेला होता. ते परत येताच पत्नीने असं काही केलं की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन परिसरातील एका व्यापाऱ्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पत्नी घरातून ५० लाखांचे वडिलोपार्जित दागिने घेऊन फरार झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका घटस्फोटित महिलेशी लग्न झाल्याचे व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले. स्वतः व्यापारी देखील घटस्फोटित आहे. हरिहरेश्वर बोट प्रकरणी ४८ तासानंतर भाजप नेत्याचा खळबळजनक दावा, सांगितले घातपाताचे धागेदोरे ऑनलाईन ओळख झाल्यानंतर दोघे प्रेमात पडले आणि एकमेकांशी विवाह केला. या लग्नानंतर तीन महिन्यांनी दोघेही युरोप टूरवर गेले होते. तेथून परतल्यानंतर काही दिवसांनी पत्नीचे भांडण झाले आणि ती बेपत्ता झाली.
महिलेने मॅट्रिमोनिअल साइटवर साधला संपर्क…
या प्रकरणी लासुडीया पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी गणेश सोळंकी यांनी सांगितले की, व्यापाऱ्याची पत्नी ५० लाखांचे दागिने घेऊन फरार झाली आहे. दोघेही काही दिवसांपूर्वी परदेश दौरा करून परतले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या महिलेने तिच्या बहिणीसह इंदूरमधील एका व्यावसायिकाशी shaadi.com वर संपर्क साधून लग्न केले होते. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.